शिकवणी Home 

काही विशेष घडामोडी....


15 August 2023: सर्वांसाठी शिक्षण हाच शिकवणीचा मूलमंत्र.

कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी ह्या गावाचं वैशिष्ट म्हणजे येथील घरटी एक व्यक्ती ही भारतीय सैन्यात आहे. सैनिकांचं गाव अशी ओळख असणाऱ्या ह्या गावातील मराठी शाळांमधील विद्यार्थी ही पुढे जाऊन सैन्यात किंव्हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उत्तम करिअर करतीलच, त्यांच्या ह्या उंच स्वप्नांना गरज आहे ती वास्तविक, आधुनिक, आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाची. मूल्य शिक्षणाचे धडे शाळेत गिरवत असतानाच त्यांना घरी जाऊन ही त्याच पद्धतीचं वतावरण मिळालं तर त्यांची शैक्षणिक प्रगती उत्तम होईल हे नक्की. म्हणूनच शिकवणी. कॉम ने नववी व दहावी च्या सर्व विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट निमित्त विज्ञान, गणित आणि इंग्रजी ह्या विषयाचे संपूर्ण वर्षाचे व्हिडिओ गाईड्स विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे ठरवले आणि ह्याला मूर्त स्वरूप आले ते ह्याच गावाचे सुपुत्र विनोद पाटील ह्यांच्या पुढाकाराने.
१५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनी त्यांना ह्या विषयाच्या शिकवणी च्या ऍप वरील कोर्सेस चे दर्शनी वाटप करण्यात आले. येणाऱ्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या अथवा त्यांच्या पालकांच्या मोबाईल वर हे कोर्सेस विनामूल्य सुरू करून देण्यात येणार आहेत.
ह्या कार्यक्रमाला सैनिक टाकळी मधील शिवाजी हायस्कूल व गर्ल्स हायस्कूल चे चेअरमन शिवाजीराव पाटील मुख्याध्यापक व्ही टी पाटील सर व अंबुपे मॅडम, दोन्ही शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिकवणी. कॉम चे संस्थापक धनंजय राजोपाध्ये, अमित बागाईतकर,कौस्तुभ सप्रे, तसेच त्यांची डिजिटल पार्टनर असणाऱ्या युवर ऍड चे अनमोल कुलकर्णी व अरबाज बटलर ह्यांची उपस्थिती होती

**************

5 ऑक्टोबर 2023, 

बालभारती, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी शिकवणी. कॉम च्या विडियो गाइड संदर्भात Kalpan Infonomics Pvt. Ltd. कंपनीस मंजूरी दिली आहे.आम्ही त्यांचे आभारी आहोत.
**************

१४ एप्रिल २०२४

साळूम्ब्रे येथील 'ग्राम प्रबोधिनी विद्यालय' या शाळेत शिकवणी.कॉम च्या टीम ने सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान, श्री. धनंजय राजोपाध्ये सर यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाचा अभ्यास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यालयात श्री. मुंढे सरांच्या मार्गदर्शनाने गणित प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे, आम्हाला या उद्घाटनाच्या कार्यक्रमास निमंत्रित केल्याबद्दल श्री मुंढे सरांचे खूप खूप आभार !