There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपल्या मुलांचं शिक्षण हा आपल्या सगळ्यांचा तळमळीचा विषय. आपली पुढची पिढी चांगली घडावी हे कोणत्याही आई बापाचं किंवा कोणत्याही सुजाण नागरिकाचं स्वप्नच.
मंडळी आजकाल शिक्षण क्षेत्रात काही अभिनव प्रयोग चालले आहेत. शिक्षणाचा अधिकार किंवा "Right to education" , online शिक्षण , सर्वशिक्षा अभियान ही काही त्याची उदाहरणे.
विशेषतः online शिक्षणात सध्या आपल्याला अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या उतरलेल्या दिसतात. त्यांच्या जाहिराती पाहून छान छान लॅपटॉप घेऊन आवडते विषय शिकण्यात मग्न असणारी मुलं आता सगळीकडे दिसत असतील असं कोणालाही वाटेल. पण खरं आहे का हो? दर वर्षी लाखाच्या घरात जाणाऱ्या फिया, मोबाईल, लॅपटॉप यांचा खर्च हे सगळं सर्वसामान्य पालकांना परवडणार आहे का? आणि गावोगावी आपल्या मातृभाषेतून शिकणाऱ्या मुलांचं काय? कारण हे सगळं online शिक्षण बहुतेक करून इंग्रजीतून आहे. म्हणजे ह्या online education ऍप मुळे आर्थिक स्तर, इंग्रजी - इतर भाषा, शहरी-ग्रामीण यातील दरी वाढतच जाणार आहे.
online शैक्षणिक ऍपचा वापर करणं हे सगळ्यांच्याच फायद्याचं असणार आहे. पण हा फायदा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. आणि म्हणूनच आम्ही काही मराठीप्रेमी आणि शिक्षणाची तळमळ असलेली मंडळी एकत्र आलो. आमच्यामध्ये काही शास्त्रज्ञ आहेत, काही इंजिनियर आहेत तर काही भाषातज्ज्ञ. आम्ही, म्हणजेच आमची कंपनी शिकवणी.कॉम तयार करत आहे शिकायची इच्छा असणाऱ्या मराठी मुलांसाठी एक ज्ञानाचा खजिना. आठवी ते दहावी साठी आम्ही इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे विषय सध्या सोप्या मराठीतून मराठीतून शिकणाऱ्या मुलांपर्यंत पोचवणार आहोत. त्याच बरोबर इंग्लिश संभाषण, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा अश्या विषयांवर मार्गदर्शन पण करणार आहोत.जगभर चाललेले नवीन प्रयोग, शिक्षणाच्या नवनवीन संधी हे सगळं आम्हाला सगळ्यांपर्यंत पोचवायचं आहे.
आम्ही हे काम जोमात सुरु केलंय. आता गरज आहे ती तुमचं सारख्या सुजाण पालकांच्या प्रतिसादाची.
Over 20 years of software product development experience and keen to use technology for everyday use.
Over 20 years of Agricultural product engineering experience and passionate about knowledge and skill development
शिकवणी.कॉम An Initiative by Kalpan Infonomics
© Copyright 2023 Kalpan Infonomics